Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

महापरिनिर्वाण दिनी कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी दर्शनासाठी खुल्या

 महापरिनिर्वाण दिनी कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी दर्शनासाठी खुल्या



कोळा:  

भारताचे संविधान निर्माते, शोषित पीडितांच्या मुक्तीचे अग्रदूत आणि मानवतावादाचा दीपस्तंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी दर्शन  महापरिनिर्वाण दिनी खुले करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.  सांगोला तालुक्यातील कोळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी  असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी अस्थी दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अस्थी स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  कोळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक हे आंबेडकरी अनुयायांसाठी अत्यंत आदराचे मानले जाते कारण मुंबईतील चैत्यभूमी प्रमाणेच बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू निकटवर्तीय महिपतराव मोरे यांनी कोळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  अस्थी आणून जतन करून ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार स्मारकासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यामधून पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या भव्य वास्तूमध्ये बाबासाहेबांच्या अस्थी या चांदीच्या कलशामध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच या स्मारकामध्ये विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली असल्याने  हे ठिकाण प्रेरणादायी आणि विचार केंद्र म्हणून विकसित होत आहे.  महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोळा येथील स्मारकामध्ये ठेवण्यात आलेल्या अस्थी कलशाचे दर्शन दिवसभर  दर्शनासाठी खुले राहणार असून या अस्थी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments