प्राथमिक शाळा पवारवाडी (वाटंबरे) येथे बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात.
वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोल तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी येथे शनिवार दि २० डिसेंबर रोजी चिमुकल्यांचा बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या आनंद बाजाराचे उद्घाटन केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्र शाळा मुख्याध्यापक आबासाहेब पांढरे , शाळा व्यवस्थापन समिती खंडू मुरलीधर पवार प्रतीकदादा पवार, विजयदादा पवार , गोविंद शेठ, अनिल शिंदे , पांडुरंग कोकरे , मठपती सर, राहुल पवार व वाडीवरील सर्व महिला पालक तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांनी बाल आनंद बाजाराचे महत्त्व आपल्या प्रस्तावकातून उपस्थित पटवून दिले व हा उपक्रम राबवणारी केंद्रातील पहिली शाळा पवारवाडी असल्याचे सांगितले व आयोजकांचे अभिनंदन केले.
*यावेळी प्रत्यक्ष बाल बाजारात खरेदीचा सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थितानी अनुभव घेतला व सर्व विक्रेत्या विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ व भाजीपाला उत्साहाने विकण्याचा प्रयत्न केला व व्यवहार ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.*
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली स्वामी तसेच उपशिक्षक सतिश सपताळ यांनी विशेष परिश्रम घेतले.*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा