वाटंबरे केंद्र शाळेत अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा .
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र
शाळेत अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधत गुरुवार दि. 18 डिसेंबर रोजी विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. यावेळी क्रीडा स्पर्धा, रांगोळी, चित्रकला, मनोरंजक खेळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
चित्रकला स्पर्धेत सिद्धी संतोष माळी इयत्ता पहिली, प्रज्ञेश पवार दुसरी, शर्वरी गाडे तिसरी, गणेश धनवडे चौथी यांनी प्रथम क्रमांक मिळविले तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षदा ऐवळे , द्वितीय क्रमांक वसुंधरा पवार व समृद्धी गेजगे , तृतीय क्रमांक अन्विता पाटोळे व भूमिका पवार यांनी पटकावला.विजेत्या स्पर्धकांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान पवार यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माता पालक गटाच्या भगिनी व इतर पालक हजर होते सर्व स्पर्धा केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने पार पडल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा