उदनवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज आनंदमय व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न.
उदनवाडी येथे भाविकभक्त श्री जयंत गणेश कुलकर्णी(काका) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्ष 19 वे तुकाराम बीजचा सोहळा मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. सुरुवातीला सकाळी ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प. राजाराम जवळे महाराज शेटफळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी आपल्या कीर्तनरुपी सेवेतून जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा जीवन चरित्र सांगितला. या कीर्तनाला हनुमान भजनी मंडळ उदनवाडी तसेच उदनवाडी गावातील व परगावच्या टाळकरी मंडळींनी चांगली साथ दिली. ह. भ .प. राऊत महाराज बलवडी यांनी मृदंगाची साथ दिली. दुपारी 12 वा. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पृष्टी झाली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व भाविक भक्त, महिला भगिनी, लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. शेवटी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल जयंत गणेश कुलकर्णी (काका) यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा