जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेमळा (चिनके) येथे आजी - आजोबा कृतज्ञता मेळावा संपन्न.
वाटंबरे /प्रतिनिधी:
मंगळवार दि .18 मार्च रोजी सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेमळा (चिनके ) येथे मुख्याध्यापक हणमंत पवार गुरुजी यांच्या कल्पनेतुन आगळावेगळा आजी- आजोबा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. शालेय आवारात आजी आजोबाचे आगमण होताच त्यांच्यावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत लेझीम नृत्य सादर केले व गुलाब पुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर काशीद गुरुजी यांनी सांगितले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जालिंदर मिसाळ गुरुजी होते . देसाई मॅडम यांनी आजी आजोबा स्नेह मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश कविता गात सादर केला.
या वेळी विद्यार्थ्याच्या हस्ते आजी आजोबा यांचे पाय पूजन करून व आरती ओवाळणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आजी आजोबा यांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी उपस्थित असणारे आजी आणि आजोबांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा