Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी होनराव कुटुंबांचे केले सांत्वन..*

*मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी होनराव कुटुंबांचे केले सांत्वन..*
सांगोला प्रतिनिधी 
        सांगोला येथील कमल सुधाकर होनराव यांचे नुकतेच निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या, तसेच भजन स्पर्धेत त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांच्या निधनाने सांगोला शहर व परिसर हळहळ व्यक्त करीत आहे. 
       त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी त्यांच्या घरी येऊन कुटुंबांचे सांत्वन केले व आधार दिला. यावेळी चंदन होनराव, नरेंद्र होनराव, कुमार भाऊ होनराव, प्रकाश तात्या होनराव, नानासाहेब होनराव, विश्वेश झपके, प्रा. मनोज उकळे, पोपट खाटीक, डॉ. गणेश सपाटे, प्रशांत दौंडे, रामचंद्र शेटे, प्रा. नानासो शेटे, मुन्ना होनराव, बाळासो होनराव, राजू होनराव, योगेश होनराव, अक्षय होनराव व होनराव कुटुंबीय उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart