Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

गुरुवर्य भालचंद्र पाटील यांचे ब्रह्मपुरी येथे प्रबोधन*

*गुरुवर्य भालचंद्र पाटील यांचे ब्रह्मपुरी येथे प्रबोधन* 

सांगोला प्रतिनिधी 
         श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचाच सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे. जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नेते ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होती व यासाठी हनुमान मंदिर ब्रह्मपुरी ता. मंगळवेढा येथे शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन ते सहा वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामीभक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. 
        सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन अशोक मोरे सर, मनोज पुजारी, विजयसिंह पाटील, सिद्धेश्वर कोकरे व विकास पुजारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart