Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

येत्या दोन महिन्यात महायुतीकडून मोठे पद मिळणार: माजी आम. शहाजीबापू पाटील.

येत्या दोन महिन्यात महायुतीकडून मोठे पद मिळणार: माजी आम. शहाजीबापू पाटील.

[स्थानिक स्वराज्य संस्थेवर धनुष्यबाणाचा भगवा फडकवण्याचा शहाजीबापू पाटील यांचा निर्धार]
सांगोला/ प्रतिनिधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माझे व शिवसैनिकांचे अतूट नाते आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपण काय योगदान दिले याचे आत्मचिंतन केले पाहिजे. ही निवडणूक सर्व व्यापक भावनेवर गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नाम. गुलाबराव पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भर भरून निधीचे मोठे योगदान दिले . उबाटाचे उमेदवार दीपकआबा म्हणतात बापूंनी मला पाठिंबा द्यायला हवा होता. मी दीपकआबांना लहान भाऊ मानून आमदारकीचे 50% अधिकार दिले हे शिवसैनिकांना दिले असते तर माझा पराभव झाला नसता. या निवडणुकीत मतदार बंधूं - भगिनींनी 91 हजार मते देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली हे काही कमी नसुन मतदारांचे आभार करून व्यक्त केले. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवधनुष्याचा भगवा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला.मला येत्या दोन महिन्यात मोठे पद मिळेल असा आत्मविश्वास मा आमदार शहाजीबापू पाटील यांनी महुद येथे कार्यकर्त्यांच्या विचारविनीमय बैठकीदरम्यान व्यक्त केला.
253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.आम शहाजीबापू पाटील यांच्या पराभवानंतर चिकमहुद तालुका सांगोला येथे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक संपन्न झाली .यावेळी मा. आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते. या बैठकीसाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बांधव, युवावर्ग उपस्थित होते .
पुढे बोलताना मा. आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सांगोला तालुक्यावर व माझ्यावरती खूप मोठे प्रेम व उपकार आहेत.अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल 5 हजार 500 कोटी रुपये विकास निधी मिळाला. या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून जावू नये व नाराजही होऊ नये. आपण सर्वांनी मोठ्या जिद्दीने, धाडसाने व उमेदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही असा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे .यापुढे सर्वांनी एक दिलाने काम करावे. तालुक्याच्या विकासासाठी निर्णयाची जबाबदारी व राजकारणाची जबाबदारी कार्यकर्त्यांनी माझ्यावर सोपवली असून मी दिलेल्या शब्द कार्यकर्ते पाळणार आहेत. 91 हजार मतदारांनी मतदान करून मोठी शिदोरी माझ्या हाती सोपवली आहे . अखेरच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या विश्वास पात्र राहून एकही काम आडू देणार नाही. कोणी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. राज्यात महायुतीचे सरकार आहे. मी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभा आहे. महायुतीचे सरकार महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी प्रयत्नशील आहे . 
माझा पराभव झाला म्हणून या सुडाचे राजकारण करणार नाही. यापुढेही सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान देण्यास सदैव तत्पर आहे अशी ग्वाही मा. आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
यावेळी सांगोला मतदार संघातील पदाधिकारी दादासाहेब लवटे, दीपक पवार, विजय शिंदे, रमेश बनसोडे, विकास मोहिते, नवनाथ माने, धनाजी कवडे, राजेंद्र खांडेकर, परमेश्वर साळुंखे, खंडू सातपुते, शहाजी‌‌ घाडगे, दामोदर साठे, सुनील शिंदे, दत्तात्रय नागणे, विजय पाटील, धनाजी चव्हाण, ॲड. महादेव कांबळे, विजय बनसोडे, यांच्यासह आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. व मनोगतामध्ये बापूंच्या झालेल्या पराभवाविषयी आत्मचिंतन केले. तसेच भविष्यात सर्वांनी जबाबदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. चिकमहुद येथील विचारविनीमय बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

चौकट: 
सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सर्व अधिकार शिवसेनेचे माजी लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांना देण्याबाबत विधानसभाप्रमुख व माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख यांनी ठरवासंदर्भात सूचना मांडली. या सूचनेस शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी अनुमोदन दिले व हा ठराव शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बहुमताने मंजूर केला. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सर्व अधिकार शहाजी बापू पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील.

Post a Comment

0 Comments