Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ३१ जुलै, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी कांता भाऊ भाऊ राठोड यांची निवड

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी कांता भाऊ भाऊ राठोड यांची निवड.



झेप फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील  वंचित, दीनदुबळ्यांना   वेळोवेळी मदत करणारे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे झेप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सेवाशक्ती वृत्तपत्राचे पत्रकार, तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, प्रदेश महासचिव युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख राज्य दैनिक बाळकडू पत्रकार या सर्व पदावर कार्यरत असणारे कांता भाऊ राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र दि. 31 जुलै रोजी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश राज्य प्रमुख पंडित प्रल्हाद कांबळे यांनी दिले  तसेच त्यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत  कांता भाऊ राठोड यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देत पक्षाची संघटनात्मक बांधणी करून पक्ष मजबूत करण्याचे आव्हान या वेळी केले या वेळी प्रशांत दादा जगताप पुणे शहराध्यक्ष, शैलेंद्र जाधव सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष यावेळी उपस्थित होते.


 झेप फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित, दिन दलित व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखविलेला आहे तो विश्वास मी माझ्या कामाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन करणार आहे असे कांता भाऊ राठोड यांनी सांगितले. यावेळी पुणे शहरातील विविध पदाधिकाऱ्यांचे निवडी या वेळी करण्यात आल्या.


कांताभाऊ राठोड व इतर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे  झेप फाउंडेशन  तसेच त्यांच्या मित्रपरिवार व सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे ‌.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart