मानवाच्या जिवनात जल,वायु, अग्नी हे महत्त्वाचे घटक आहेत या मधिल एखाद्या घटकाचे प्रमाण कमी जास्त झाल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊन त्याचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो या पर्यावरण बदलाच्या समस्यांशी अनेक देश झुंजत देत आहेत.
मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे वाढते शहरीकरण व त्या साठी मोठ्या प्रमाणावर होत असलेली बेसुमार वृक्षतोड यामुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेले हवेचे प्रदूषण त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात मानवी जीवनावर परिणाम होत आहे या सर्व गोष्टीचा विचार करत करत पुणे येथील मोड्युलवर्क्स या कंपनीने पुणे येथील कसारसाईजवळ कुसगाव येथे भव्य वृक्षारोपण मोहीम संपन्न केली.
स्वयंप्रेरणेने झपाटलेल्या मोड्युलवर्क्सच्या अभियंत्यांनी व व्यवस्थापनाने सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत, स्वयंसेवी ग्रामस्थांना बरोबर घेऊन, समाजसेवेच्या संधीचे सोने करीत जागतिक पर्यावरण संवर्धनाचे महान उद्धिष्ट साध्य केले.
या वृक्षारोपण मोहिमेदरम्यान विविध प्रजातींच्या १०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीबरोबर वृक्षांचे संगोपन होणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवुन मोड्युलवर्क्सने त्यावरील उपाययोजना नियोजिली आहे. प्रत्येक १० कर्मचाऱ्यांची एक टीम अशी वर्गवारी करून अनेक टीम बनवल्या जातील. प्रत्येक टीम एका पाण्याच्या टँकरसाठी जो खर्च येईल त्याची जबाबदारी स्वीकारणार आहे उन्हाळ्यामध्ये या टँकरचा वापर दर आठवड्याला झाडांना पाणी देण्यासाठी केला जाणार आहे अशी माहिती या वेळी कंपनीच्या वतीने देण्यात आली.
या वृक्षारोपणावेळी कुसगावचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता नामदेव केदारी, प्रशांत तनपुरे आणि इतर स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासाठी लागणारी जागा व इतर आवश्यक साधनांची उपलब्धता करून देत मोठ्या प्रमाणावर कंपनीला सहकार्य केले . या वेळी मोड्युलवर्क्स तर्फे त्यांचे आभार मानले गेले.
या वेळी गावातील स्वयंसेवकांनी भविष्यातील वृक्षारोपण मोहिमेसाठी शेतकऱ्यांना व पर्यावरणाला दोघांना पूरक फळझाडांचे वृक्ष देण्यात यावेत जेणेकरुन शेतकरी स्वेच्छेने त्यांची शेतजमीन लागवडीकरिता उपलब्ध करून देतील व दीर्घकाळ रोपांना पाणी देण्याची
जबाबदारी पण अगदी आनंदाने स्वीकारतील तसेच यावेळी त्यांनी मोड्युलवर्क्स कंपनीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
या वेळी कंपनीच्या वतीने हरीत पुणे, स्वच्छ पुणे आणि निरोगी विश्व निर्माण करण्यासाठी मोड्युलवर्क्स प्रयत्न करीत राहील असे यावेळी सांगण्यात आले.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा