वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे ता. (सांगोला) येथील विकास सेवा सोसायटी चे संचालक ,वाटंबरे व्यापारी संघटनेचे सदस्य लक्ष्मण बाबू मोरे यांचे बुधवार दि.१० जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .निधना वेळी त्यांचे वय वर्षे ७० होते . किराण व्यवसायामुळे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये व व्यवसायिकामध्ये मोरे आण्णा या नावाने प्रसिद्ध होते .मंद्रुप येथील भिमराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत असणारे पीएचडी पदवी प्राप्त जवाहर मोरे सर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये होणार अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Comments System
blogger/disqus/facebook
Disqus Shortname
designcart

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा