यशवंत हायस्कूल शिरभावी प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मेळावा.
वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला( ता)शिरभावी येथील यशवंत हायस्कूल या प्रशालेमध्ये २०१५-१६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुक्रवार दि.२८ जुन रोजी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे शाल श्रीफळ फेटा व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यकांत पवार व प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग ताटे होते यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी भावना प्रकट केल्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सूर्यकांत पवार, प्रमुख पाहुणे पांडुरंग ताटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्वच माजी विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रशालेमध्ये स्नेह मिळावे आयोजित करुन आपल्या मित्रांशी व शाळेशी आपल्या विचारांची देवाण-घेवाण करावी असे म्हटले .
यावेळी प्रशालेतील सुरवसे सर, घाडगे सर , बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेचि विद्यार्थ्यांनी अंकीता सुरवसे ने शाळेला पोर्टेबल स्पीकर संच भेट म्हणून दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गळवे सर व आभार प्रदर्शन घाडगे सर यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा