तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार ) यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर पाठिंबा.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार ) यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर पाठिंबा.
मुंबई - तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) यांच्या पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर पाठिंबा दिला व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माझ्या सह सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला मुंबई येथील राष्ट्रवादी भवन ब्लाड इस्टेट, व्ही टी स्टेशन जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदर्शावर व तत्वावर आम्ही बिनशर्त निष्ठा ठेवतो, आम्हाला साहेबांनवर पुर्ण विश्वास व निष्ठा असल्यामुळे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई व त्यांचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील साहेब व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.पंडीत कांबळे साहेब यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाला आमचा मनापासुन अटल बिनशर्त जाहीर पाठिंबा आहे असे स्टँप पेपरवर शपथ पत्र लिहून दिले.
याप्रसंगी पक्ष कार्यालयात आपल्या छोट्या खाणी भाषणात सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.पंडीतजी कांबळे साहेब यांनी तथागत ग्रुपच्या कार्या विषयी पक्षाचे वरिष्ठ मंडळी ना उत्तम पणे कार्य समजावून आपल्या भाषणामध्ये सांगितले यावेळी सर्व तथागत ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्व व्यासपिठाचे आभार मानले..
यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल माने, अरुन जगताप, सुनिल वनारे, कांताभाऊ राठोड, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, सचिन गवई, सुर्यकांत खेतले, विवेक सांळुके, गौतम नरवाडे, संदिप राऊत, श्रीकृष्ण शेटाने, अख्तर कुरेशी, महादेव मोरे, देवानंद अवसरमोल, तसेच महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ललीताताई मगरे, जाकेरा बी शेख, प्रतिभा गवई, आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य व महिला आघाडी उपस्थित होते..



No comments