शिक्षक फारूक काझी यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
*शिक्षक फारूक काझी यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील शिक्षक फारूक काझी सध्या जि.प. शाळा गौडवाडी ता. सांगोला येथे कार्यरत असून, राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या "जादुई दरवाजे" या पुस्तकाला कुंडल कृष्णा ई प्रतिष्ठान सातारा या प्रख्यात संस्थेचा उत्कृष्ट बालकथा संग्रह राज्य पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.
या अगोदर काझी यांच्या अनेक पुस्तकांना साहित्य पुरस्कार मिळाले असून, एक उपक्रमशील शिक्षक, प्रशिक्षक व लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तसेच बाल साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच त्यांचे चुटकीच जग ही किशोर कादंबरी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या मराठी च्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

.jpg)
No comments