Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

माजी जि .प .अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा जयमाला ताई गायकवाड यांचा वाटंबरे गाव भेट दौरा.

 माजी जि .प .अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा जयमाला ताई गायकवाड यांचा वाटंबरे गाव भेट दौरा.



{महिला बचत गटाशी व वाटंबरे गावातील नागरीकांशी  साधला संवाद}


वाट़ंबरे/प्रतिनिधी:बचत गटाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी,बचतीची सवय,व्यवसाय करण्याची क्षमता, नेतृत्वगुण,अल्प व्याजदरात कर्ज यासह विचारांची देवाणघेवाणही झाली आहे. महिलांनी लहान-लहान उद्योगधंद्याद्वारे स्वतःची आर्थिक परिस्थिती सांभाळली आहे. आज अनेक महिला उद्योग क्षेत्रात क्रांती घडविताना दिसत आहेत. यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम म्हणजे बचत गट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या गांव भेट दौऱ्यामध्ये  दि.१७ जानेवारी मंगळवारी वाटंबरे  येथे गांवभेट दौरा संपन्न झाला. यावेळी नागरिकांसमवेत संवाद साधत असताना गांवातील बचत गटातील महिलांवर त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्षा जयश्री पाटील,पारे गावचे माजी सरपंच संतोष पाटील, संभाजी हरीहर सर, मिसाळ ताई सरपंच किरण पवार, ग्रामपंचायत सदस्य सुचित्रा गेजगे  , ग्रामपंचायत सदस्या शोभा गायकवाड, बबन तात्या पवार ,माजी ग्रामसेवक मधुकर पवार माजी ग्रामपंचायत उपसरपंच रेखा पवार, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या सचिवा पवार मॅडम नियोजन समिती सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य बिरा गेजगे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष  विजय दादा पवार ,श्रीधर पवार ,उमेश गायकवाड, रामभाऊ पवार, नारायण पवार, सुकदेव पवार, अविनाश पाटोळे मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटातील अध्यक्षा सर्व सदस्य ,पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर महिला व वाटंबरे गावातील नागरिक यावेळी उपस्थित होत्या.


यावेळी बोलताना जयमालाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, ग्रामीण विकासात महिला बचतगटांनी चांगली सुरुवात केली असून बचतगटाद्वारे अनेक उद्योग उभारणीस चालना मिळाली आहे. महिला बचत गटाची प्रगती व्हावी व विकास वृध्दी होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा फायदा महिला बचत गटांनी घेतला पाहिजे.यावेळी त्यांनी महिलांना बचत गटांचे महत्त्व,बचत गटांना येणाऱ्या समस्या, बचत गटांमार्फत करता येणारे उद्योग,शासकीय योजना,विविध कर्ज योजना आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करीत,बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनवलेल्या वस्तू व प्रॉडक्ट साठी मार्केट उपलब्ध करून देण्याची हमी घेत महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक समृद्ध व्हावे,यासाठी हा दौरा असून महिलांच्या इतर अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत,असेही जयमालाताई गायकवाड यांनी सांगितले महिला बचत गटातील महिलांनी त्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर सांगितल्या यावेळी त्यांनी त्या अडचणी सोडविण्याचे महिलांना आश्वासन दिले तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्रीधर पवार यांनी गावातील दारूबंदी विषय मुद्दा  उपस्थित केला तसेच पंचायत समिती सदस्य बिरासाहेब गेजगे यांनी स्थानिक समस्या ताईंच्या कानावर घातल्या .यावेळी ताईनी सरपंच किरण पवार  व इतराशी चर्चा करून यातून मार्ग काढू असे त्यांना आश्वासन दिले .  यावेळी त्यांनी महिला बचत गटातील महिलांची व वाटंबरे गावातील नागरीकाशि खेळीमेळीच्या वातावरण संवाद साधला त्यामुळे महिला बचत गटातील महिला व नागरिकांनी ताईने चालू केलेल्या या गाव भेटीबद्दल   समाधान व्यक्त केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart