Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

माऊली संगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला संगीत महोत्सव उत्साहात संपन्न

 माऊली संगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला संगीत महोत्सव  उत्साहात संपन्न

            



माऊली संगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त माऊली संगीत भजनी मंडळ व सांगोला संगीत प्रेमी यांच्यावतीने सांगोला संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सत्रामध्ये संगीत कार्यशाळा संपन्न झाली, या संगीत कार्यशाळेसाठी पंडित श्री. श्यामसुंदरजी सुतार गुरुजी, कोल्हापूर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर गुरुवर्य श्री बाळासाहेब कुंभार गुरुजी कवठेमहांकाळ यांचेही या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेमध्ये शास्त्रीय संगीतातील रियाज व रागांचे शास्त्र, विस्तार, ताल व तालातील लयकारी- यांचा गायनामध्ये उपयोग, राग, समय, रस यांचा परस्पर संबंध, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, भजन आणि भजनाचे शास्त्र , यावर सखोल मार्गदर्शन झाले. दुसऱ्या सत्रामध्ये संगीत मैफिल झाली यामध्ये गायत्री नरळे, साक्षी काळेल,अमोल आवळे , श्रीराज शिंदे या विद्यार्थ्यांनी गायन केले. त्याचबरोबर पंडित श्यामसुंदरजी सुतार गुरुजी यांनी आपल्या रसाळ वाणीने आणि गायनाने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी श्री संदीप गोंधळी व श्री दयानंद बनकर सर यांचे गायन झाले. तबला साथ शुभम तुरंबेकर, सुधाकर कुंभार, रोहित सुतार,बालाजी पांढरे,  यांनी केली. तर पकवाज साथ सागर माळी, शशांक आटपाडकर व चैतन्य झाडे यांनी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.


याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रभाकर माळी, डॉक्टर पांडुरंग गव्हाणे,  श्री सदाशिव बनकर ,श्री गजानन बनकर, श्री शिवाजी नाना बनकर, श्री विजय राऊत, श्री रमेश माळी, श्री गोविंद माळी ,श्री कृष्णा इंगोले ,श्री सोमनाथ इंगोले ,श्री अभिषेक सुभाष लिंगे, श्री अरुण वाघमोडे,श्री रामदास रोंगे,श्री प्रसाद कुलकर्णी, श्री राजेश खिस्ते श्री महिबूब नदाफ , श्री अस्मिरजी तांबोळी  हे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart