दासू पवार सर यांच्या जयंतीनिमित्ताने आठवणींना उजाळा.
दासू पवार सर यांच्या जयंतीनिमित्ताने आठवणींना उजाळा.
भारदस्त व्यक्तिमत्व दमदार आवाज भेदक नजर प्रसन्न मुद्रा कर्तव्यदक्ष हे सदैवंगी बनवलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे आदरणीय जीवन शिक्षण प्रसारक मंडळ वाटंबरेचे संस्थापक कैलासवासी दासू पवार सर. सर्व लोक त्यांना दासू सर या नावाने ओळखतात. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1938 साली वाटंबरे या नगरीमध्ये झाला. तसेच त्यांचे शिक्षण हे बीएससी बीएड असून त्यांनी बीएससी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे या ठिकाणी केले तर बीएड शिक्षण महाविद्यालय सांगली येथे केले. काळाबरोबर येणारी नवीन आव्हाने पेलताना त्यांच्याकडे केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पहावी. मरगळ झटकून कायम नाविन्यपूर्णतेचा ध्यास असणं अधिक महत्त्वाचं आणि त्याचं सोनं कशा पद्धतीने करता येईल हेच नेहमी सरांनी पाहिले. त्यांनी त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि 1962 ते 68 या कालावधीत ना जरा विद्यामंदिर प्रशाला ना जरा येथे उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. हे कार्य करीत असताना त्यांनी ध्यास आत्मविश्वास परिश्रम आणि अभ्यास ही चतुसूत्री शिक्षक म्हणून आत्मसात करायला हवी ही गोष्ट शिक्षक वर्गांना दाखवून दिली त्याचबरोबर वाटंबरे गावामध्ये जशी मानगंगा वाहते तशीच शिक्षणाची ही ज्ञानगंगा व्हावी यासाठी सरांनी खूप कष्टाने चिकाटीने दिवस रात्र मेहनत घेतली. व जून 1938 स*** अखेर श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे ही शाळा सुरू केली. ही शाळा सुरू केल्यानंतर शिक्षकाला विद्यार्थ्यांबरोबर समाज व समाज परिस्थिती ही वाचता येणे आवश्यक आहे कारण समाजाचा चरित्र घडवण्याचं काम शिक्षकच करत असतात आणि हीच दूरदृष्टी ठेवून सरांनी शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक आणि गाव स्वयंपूर्ण बनवण्याचा आणि परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जीवन विकास मंडळ दूध डेअरी विकास सोसायटी पतसंस्था महाराष्ट्र बँक व डीसीसी बँक यासारख्या संस्था स्थापन करण्यात सहकार्य केले 1984 स*** दारूबंदी करून गाव व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न केला खंडोबा मंदिराचा ट्रस्टी म्हणून काम केले त्यातून येणारा पैसा मंदिराच्या विकासासाठी वापरला. सुसंस्कृत अभिरुची संपन्न नागरीक घडावेत म्हणून प्रयत्न केले. शाळा ही गावाच्या आणि पंचक्रोशीच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र बनले आणि या बहरलेल्या ज्ञानरूपी संस्थेला पुढे चालवण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहनराव पवार सर आणि सचिवा सुनीता पवार मॅडम यांनी केले आहे. सरांच्या दिलेल्या शिक्षणाची शिदोरी पुढे नव्या जोमाने उत्साहाने चालताना दिसत आहे हे नक्की म्हणूनच शेवटी एवढंच म्हणेन सळसळणाऱ्या पाण्यापरी अंगी रक्त व्हावं " बहरलेल्या फुलांचा सुगंध घेऊन वाहत जावो क्षण क्षण ठेचून सुंदर जेवण जगावं निर्मळ आकाशातरी स्वच्छ मन असावं चंद्राचे शितल छाया आणि सूर्याचे घेऊन जगावं श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये एकदा तरी शिकून पाहावं एकदा तरी शिकून पाहावं.
संकलन
भाग्यश्री घुले पवार.



No comments