Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, २ जुलै, २०२६

ॲड. संदिप कागदे यांचे 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान संपन्न

 ॲड. संदिप कागदे यांचे 'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान संपन्न 



पंढरपूर प्रतिनिधी :


मराठी पत्रकार संघ पंढरपूर यांच्या वतीने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र ता.पंढरपूर येथे 26 जून 2026 रोजी  'पत्रकारिते संबंधी कायदे' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,

कार्यक्रमाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.


ॲड. संदिप कागदे यांनी भारतीय राज्य घटना , मूलभूत अधिकार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध , वैयक्तिक जीवनाचा अधिकार, अब्रूनुकसानीचा कायदा या सह पत्रकारितेशी संबंधित विविध कायदेशीर बाबींवर उपस्थित पत्रकारांना सविस्तर मार्गदर्शन केले. वृत्तांकन करताना पत्रकारांनी कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच पत्रकारांची कर्तव्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयी त्यांनी मार्गदर्शन केला.


ॲड. संदिप कागदे यांचे शिक्षण बी. एस. सी., एल. एल. एम., सेट, नेट. (B.Sc.,L.L.M.,S.E.T., N.E.T) आहे. त्यांना विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने "विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार" देउन गौरवण्यात आले आहे. सत्र न्यायालय व मुंबई उच्चन्यायालय येथे विविध प्रकारच्या फौजदारी केसेस चालवन्याचा त्यांना अनुभव आहे, कायदा, शिक्षण, युवा सक्षमीकरण आणि पत्रकार सक्षमीकरण ह्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 



चिंचणी येथे आयोजित मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात  'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप'(CONSTITUTIONAL PRESPECTIVE OF FREEDOM OF SPEECH AND EXPRESSION) आणि अब्रूनुकसानीचा कायदा (LAW OF DEFAMATION) या विषयावर ते बोलत होते.


ह्यावेळी ॲड. संदिप कागदे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन जेष्ठ पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सत्कार केला.


मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संघटनेचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड यांनी केले होते.


यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचे मोहन अनपट, सचिन कुलकर्णी, प्रवीण नागणे यांनी पत्रकार संघटनेच्या विधायक उपक्रमांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद पोतदार यांनी केले.


या प्रसंगी डी राज सर्वगोड,कल्याण कुलकर्णी, रामकृष्ण बिडकर, दत्तात्रय पाटील, विनोद पोतदार, लखन साळुंखे, व्याख्याते व लेखक किरण निकम, कबीर देवकुळे, अमोल गुरव, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल माने तसेच मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र शाखा, पंढरपूरचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे पत्रकारांना पत्रकारितेतील कायदेशीर पैलूंची अधिक स्पष्ट माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.


माझ्या अध्यापनाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न घडवता सुजाण नागरिक घडवण्याचे काम केले : तानाजी खंडागळे

 माझ्या अध्यापनाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न घडवता  सुजाण नागरिक  घडवण्याचे काम केले : तानाजी खंडागळे



(श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत सेवानिवृत्ती पर  सोहळा आयोजित)


वाट़बरे/प्रतिनिधी:

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेत मी जून 1992 ला रुजू झालो व 31 मे  या प्रशालेतून 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. या प्रशालेचे संस्थापक कै. दा.सु.पवार सर यांनी या संस्थेत मला नोकरी दिली फक्त नोकरी दिली नाही तर माणसं दिली, नाती दिली तसेच मला खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम  पवार  सरांनी केले .सेवानिवृत्ती पर  आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की मी अध्यापनाचे कार्य करताना इंग्रजी आणि राज्यशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन केले इंग्रजीचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजीची असणारी भीती लक्षात घेता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंग्रजी सोप्या पद्धतीने कसे शिकवता  येईल व विद्यार्थ्यांना ते कसे समजेल हे मी पहिले तसेच राज्यशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकविला आज या प्रशालेतील विद्यार्थी  विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान वाटतो माझ्या नोकरीच्या कार्यकाळात  सुखदुःखात कुटुंबातील सदस्य , माझे सहकारी व संस्था माझ्या पाठीमागे वेळोवेळी उभी राहिली त्यामुळे या सर्वांचा मी शेवटपर्यंत ऋणी राहीन .


श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेत गुरुवार दि. 2 जूलै रोजी शाळेचे सहशिक्षक तानाजी खंडागळे यांच्या सेवानिवृत्ती पर सोहळा आयोजित केला होता या वेळी यशवंत हायस्कूल शिरभावी चे सहशिक्षक शहाजी घाडगे रा .हातीद हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचाही यावेळी प्रशालेच्या वतीने सत्कार घेण्यात आला.

यावेळी प्रशालेच्या वतीने तानाजी खंडागळे व त्यांच्या कुटुंबाचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहाजी घाडगे यांचा ही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक,  तसेच तानाजी खंडागळे सरांचा  मित्रपरिवार ,वाटंबरे ग्रामस्थ हतीद ग्रामस्थ तसेच प्रशालेतील माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत वाटंबरे ,विकास सेवा सोसायटी वाटंबरे तसेच गावातील विविध संस्थेचे चेअरमन तसेच विविध मान्यवरांनी  शिक्षकांचा शाल ,फेटा ,श्रीफळ देऊन सत्कार केला .

यावेळी  शाळेचे संस्थापक मोहन पवार सर, माजी विद्यार्थी,  सरांचे सहशिक्षक तसेच त्यांचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी आपल्या मनोगतातुन सरांच्या विविध पैलूंची माहिती देत सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पिंटू पवार सर यांनी केले.


बुधवार, १ जुलै, २०२६

सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत

सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इयत्ता पाचवीची मंजुरी. :- शिक्षण व आरोग्य सभापती श्री चेतनसिंह केदार सावंत 

सोलापूर | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाच्या दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील (GR) निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.

शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या शिफारशीनुसार मा. श्री. कुशल जैन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी वर्गवाढीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासन निर्णयातील सर्व अटी व निकषांची पडताळणी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. वाहतुकीची अडचण, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षण अर्धवट सोडत असल्याची समस्या निर्माण होत होती. आता गावातच पाचवीचा वर्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा गळती रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पालकांचा आर्थिक व मानसिक ताणही कमी होणार आहे.

या निर्णयामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला घराजवळच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला यामुळे बळ मिळणार आहे.या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.

चौकट 
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवी सुरू करण्यास मंजुरी मिळाली, ही आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे शाळा गळती कमी होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठे बळ मिळेल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.”ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे.
– मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत
सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद सोलापूर

सोमवार, २९ जून, २०२६

भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

 भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन. 


वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला  (वाटंबरे )येथील भारत ज्ञानू पवार यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि 30 जून रोजी दुःखद निधन झाले. निधना समय त्यांचे वय 61 होते त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,चार मुली असा परिवार आहे. 

त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दि. 2 जुलै रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली.



🎤 KHABARDAR NEWS 

✨ आवाज जनतेचा ✨

━━━━━━━━━━━━━━━

🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 

🟨 संपर्क: दत्तात्रय पवार

📞 मो:8007913668

मानेगाव येथे हृदयद्रावक घटना (मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)

 मानेगाव येथे हृदयद्रावक घटना 

(मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू)



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४२ वर्षीय असलम अब्दुल सय्यद यांचे निधन झाले. मुलाच्या अकाली जाण्याचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासांत त्यांच्या ६७ वर्षीय आईचेही निधन झाले. त्यामुळे अवघ्या १२ तासांच्या अंतरात माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर ओढवली.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे असलम सय्यद यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच जन्मदात्या वृद्ध आईचेही हृदयविकाराच्या धक्क्यानेच निधन झाल्याने मानेगावात ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना रविवार, २८ जून रोजी मानेगाव ता. सांगोला येथे घडली.

असलम अब्दुल सय्यद (वय ४२) व अयुफा अब्दुल सय्यद (वय ६७) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत. मृत दोघांवर सायंकाळी स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


रविवार, २८ जून, २०२६

आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.

आ. बाबासाहेब देशमुख यांची राजूरी येथे भेट.



वाटंबरे/ प्रतिनिधी:
सांगोला राजुरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरट्यानी मंदिरामध्ये लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची विटंबना करत दीड किलोचा मुकुट, मनी मंगळसूत्र तसेच काही ऐवज लंपास केला  या  चोरीच्या घटनेने पूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ माजली होती.या चोरीच्या संदर्भात राजुरी ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्यात आले होते तसे या चोरीचा लवकर तपास न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची प्रशासनास ग्रामस्थांच्या वतीने इशारा देण्यात आला होता.  आ. बाबासाहेब देशमुख यांनी काल रविवार दि. २८ जून रोजी दुपारी तीन वाजता राजुरी येथे भेट देत या चोरीच्या संदर्भातील सर्व माहिती  ग्रामस्थांकडून घेतली यावेळी ग्रामस्थांकडून चोरीचा संथ गतीने चालू असलेला तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली . यावेळी त्यांनी पोलीस प्रशासना बरोबर चर्चा करून या चोरीचा तात्काळ तपास  करत चोरट्यांना  अटक करण्यात येईल  असे आश्वासन बैठकीत ग्रामस्थांना दिले यावेळी मोठ्या प्रमाणावर राजुरी ग्रामस्थ   उपस्थित होते .
जे

नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न

 नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती  चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न 


“दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण”चा संदेश; प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन



सांगोला, दि. २८ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी उपस्थित पालक व नागरिकांना मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण!” हा केवळ संदेश नसून प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्याची हमी आहे. पोलिओ हा लसीकरणाद्वारे पूर्णपणे टाळता येणारा आजार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला प्रत्येक पल्स पोलिओ मोहिमेत दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील दोन थेंब आवर्जून पाजावेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, ही प्रत्येक पालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “निरोगी बालक हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन केले.



या कार्यक्रमास सांगोला पंचायत समिती उपसभापती श्री. अजय सरगर, सांगोला पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप देवकते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओंकार कोरे, श्री. संजय शेळके, श्री. भालचंद्र भंडारे, श्री. रमेश पाटील, श्री. नामदेव आलदर, श्री. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक अधिकारी डॉ. जिलानी काझी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, परिचर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचवूया… पोलिओमुक्त भारत घडवूया!” असा निर्धार व्यक्त केला.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart