Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ६ जून, २०२६

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघात विरहित कामगिरीबद्दल अण्णासाहेब जगताप पुरस्काराने सन्मानित.

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघात विरहित कामगिरीबद्दल अण्णासाहेब जगताप पुरस्काराने सन्मानित. 


वाटंबरे/प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील अपघात विरहित चालकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वाटंबरे तालुका सांगोला येथील सांगोला आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत असणारे अण्णासाहेब जगताप यांनी 25 वर्ष अपघात विरहित सेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे या ठिकाणी अण्णासाहेब जगताप यांनी १९९९ साली एसटी चालक म्हणून कामास सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी १६ वर्ष विना अपघात कार्य केले नंतर ते सांगोला येथे १० वर्षे एसटीमध्ये सेवा बजावत आहेत. या २६ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एसटीच्या माध्यमातून विना अपघात प्रवाशांची सुरक्षितपणे सेवा केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये विना अपघात विरहित बॅच, प्रशस्तीपत्र तसेच रोख रक्कम पंचवीस हजार व शाल श्रीफळ देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.



चौकट: यावेळी त्यांनी २६ वर्ष एसटीमध्ये सेवा बजावत असताना आलेले अनुभव कथन करताना ठाणे आगारात काम करत खंडाळा घाटातील ट्रॅफिकचे अनुभव यावेळी त्यांनी सांगितले ठाणे अक्कलकोट या बसवर चालक म्हणून त्यांना आलेले अनुभव रात्री गाडी चालवताना येणारे अनुभव तसेच आपल्या एस टी मधील प्रवाशांचा सुरक्षित प्रवास कसा होईल व तो प्रवासी गावापर्यंत कसा पोहोचला जाईल या विचाराने मी प्रेरित होऊन मी एसटीमध्ये काम करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart