सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात
पुणे:- सीएफआय व बीएनवाय संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे 2024-25 या सालाकरिता गरजू मुलामुलींना उच्च शिक्षणाकरिता मदत करण्यात आली. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनांतर्गत 22 हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शैक्षणिक प्रगती चांगली असून पण कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे किंवा मुख्यत्वेकरून ज्या मुलांच्या डोक्यावर आई-वडिलांचे छप्पर हरविलेले आहे, या व अशा अनेक कारणांमुळे त्यांचं शिक्षण थांबू नये व त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कोणतेही आर्थिक दडपण न ठेवता शिक्षण घेता यावे हा या मदतीमागचा मुख्य उद्देश होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा