Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

उपक्रमशील आंबा उत्पादक शेतकरी : नवनाथ पोपट बाबर, चोपडी

 उपक्रमशील आंबा उत्पादक शेतकरी : नवनाथ पोपट बाबर, चोपडी 



सांगोला/ प्रतिनिधी: (दशरथ बाबर ) सांगोला तालुक्यातील चोपडी -बंडगरवाडी येथील प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी नवनाथ पोपट बाबर यांनी अर्थशास्त्र विषयातून पदवी संपादन केली असून संशोधक दृष्टीकोणामुळे अल्पावधीतच नावारूपाला येत आहेत. नवनाथ बाबर यांना एकूण १२ एकर शेती क्षेत्र असून २ एकर क्षेत्रावर आंब्याची बाग, ५०० झाडांची डाळिंब बाग व ४००झाडांची सीताफळाची बाग त्यांच्या शेतामध्ये आहे. नवनाथ बाबर यांनी आपल्या २ एकर क्षेत्रात आंब्याची लागवड केली आहे. ६०० आंबा झाडांपैकी सध्या ४५० झाडावरती आंबा बहरला आहे. आंबा उत्पादन घेत असताना त्यांनी आंबा झाडावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची कलमे बांधली आहेत. त्यांनी आंबा बागेत एका झाडावरती साधारण वीस प्रकारच्या आंब्याचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग राबवला आहे .दोन वर्षापूर्वी लागवड केलेल्या आंबा झाडावरती प्रचंड प्रमाणात मोहर आला होता .परंतु निसर्गाच्या  अवकृपेमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे . या आंब्यासाठी सेंद्रिय खते व औषधे यांचा वापर करण्यात आला आहे. कमी पाण्यावरती कमी खर्चात आंबा उत्पादनाचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. त्यांना शेती उत्पादनासाठी त्यांच्या कुटुंबाची साथ 

मिळत आहे. 


 नवनाथ बाबर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आंबा लागवडीनंतर पाच वर्षापर्यंत आंब्याच्या झाडांना चांगले जोपासले पाहिजे. नवनाथ बाबर व आंबा उत्पादक मित्र परिवाराने महाकेशर फार्मर कंपनी नावाने ७०००आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला आहे. तसेच यामधून  निवडक ९ शेतकऱ्यांचा माणदेश महाकेशर आंबा ग्रुप तयार करण्यात आला आहे. महाकेशर फार्मर कंपनीचे सर्वेसर्वा नारायण पाटील सर संभाजीनगर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे. नवनाथ बाबर यांनी आपल्या आंबा बागेसाठी केमिकल विरहित, ऑरगॅनिक खते- औषधे यांचा वापर केला आहे. ४५० झाडातून साधारण पाच टनांचे उत्पादन अपेक्षित असून आंबा विक्रीचे व्यवस्थापन स्वतः नवनाथ बाबर हे करणार आहेत. शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची विक्री व्यवस्था तयार करण्यात येणार असून ग्राहकांना थेट केमिकल विरहीत दर्जेदार आंबा खायला मिळावा या दृष्टीने त्यांचा व ग्रुपचा प्रयत्न आहे.  त्यांच्या आंबा बागेस पत्रकार दशरथ बाबर व प्रगतशील शेतकरी सिद्धनाथ गुरव यांनी भेट देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.



चौकट :

 ४५० आंब्याच्या झाडातून सुमारे ५ टन आंबा उत्पादन अपेक्षित आहे. आंब्याच्या बागेत सध्या हापूस, केशर, सोनपरी ,रत्ना, मियाझाकी, ब्लॅक कस्तुरी, बदामी, ॲप्पल मॅंगो, दशेरी पिठुळी, सिंधू, बनाना मॅंगो, खोबरी आंबा, रूमानी, एटीएम (वर्षभर आंबा) तोतापुरी, शेपू, वनराज, टोमॅटकीन आदी विविध प्रकारच्या व्हरायटी आंबा बागेमध्ये आहेत. येत्या आठ दिवसात आंबा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान स्वतः कलमे बांधून तयार केलेल्या आंब्याची नर्सरी सुरू करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांना अल्प किमतीमध्ये विविध प्रकारची दर्जेदार आंबा रोपे उपलब्ध करून शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल. ---

नवनाथ पोपट बाबर, प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी (चोपडी- बंडगरवाडी) अधिक माहितीसाठी संपर्क :- मो.नं.९९२२१४६६२६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart