*सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांची निवड अभिमानास्पद - अध्यक्ष रविराज शेटे*
सांगोला प्रतिनिधी
अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली व यामध्ये अध्यक्षपदी राजाभाऊ माने, प्रदेश महासचिव पदी विकास भोसले यांची निवड झाली परंतु महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोल्याचे संपादक सतीश भाऊ सावंत यांची व उपाध्यक्षपदी संपादक चांद भैया शेख यांची निवड होणे म्हणजे सांगोल्याच्या दृष्टीने अभिमानाची आहे व दोघांची निवड म्हणजे दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगोला तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगोला येथे दोघांच्या सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.
सावंत व शेख यांच्या दोघांच्या निवडीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांनी योग्य न्याय व सन्मान दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी सत्कार मूर्ती सतीश भाऊ सावंत व चांद भैया शेख यांनी संघटना वाढीसाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करू असे सत्कार प्रसंगी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष सचिन धांडोरे, सचिव दत्तात्रय पवार, सदस्य विनोद चंदनशिवे, करण मोरे, समाधान धांडोरे, सचिन कुंभार, सुनील पवार, समाधान गंगणे, कृष्णदेव इंगोले, मा. सरपंच संतोष पाटील इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन दांडोरी यांनी तर सर्वांच्या आभार दत्तात्रय पवार यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा