कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील महायुतीच्या उमेदवारांना वासूद गावातून मताधिक्य देवू : उपसरपंच अनिल केदार.
*श्री हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ ,
सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ वासुद गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच अनिल केदार म्हणाले, वासुद गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करु.
यावेळी सुनील भोरे सर म्हणाले, वासूद गावातून मा.आमदार शहाजीबापू पाटील यांना कायम बहुमत दिले आहे. त्याप्रमाणे कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत सांगोला तालुक्याला निधी कमी पडणार नाही. आपले कोणतेही काम भविष्यात आडणार नाही. त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वासूद गावातून मोठ्या मताधिक्याने निवडून देवू असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मा. जि. प .सदस्य अशोकभाऊ शिंदे म्हणाले 2012 साली मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभारलो होतो. त्यावेळी द वासूद गावाने मताधिक्य दिले होते. यावेळी वासुद गावच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, वासूद येथे ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला चांगला प्रतिसाद दिला असल्याबद्दल आभार व्यक्त करीत कडलास गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतो. मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.यावेळी माजी सरपंच अरुण केदार यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी उमेदवार शोभाताई खटकाळे, उमेदवार राणीताई पाटील, उद्योगपती सौदागर केदार, विष्णुपंत केदार, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उपसरपंच बंडू केदार, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सागरदादा पाटील, संजय केदार,चेअरमन अनिल खटकाळे, धर्मराज केदार, जगन्नाथ केदार ,भागवत शिंदे, महादेव शिंदे, उपसरपंच रजाक मुलाणी, अनिकेत सुरवसे ,नितीन चंदनशिवे, दिगंबर शिंदे, चेतन खटकाळे, विकास केदार, साहिल शिंदे ,विशाल खटके ,रोहन शिंदे ,यांच्यासह आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा