Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

सामाजिक समरसता मंच व शाहू शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून बंधुता परिषद पंढरपूर येथे संपन्न

 सामाजिक समरसता मंच व शाहू शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून बंधुता परिषद पंढरपूर येथे संपन्न



पंढरपूर प्रतिनिधी. 

जानेवारी १९४० मध्ये कराड येथे महामानव भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड येथील एका शाखेस भेट दिली होती त्यावेळी त्यांनी संघाकडे आपले पणाने पाहतो असे म्हटले होते. या घटनेस ८५ वर्ष झाली याचे औचित्य साधून 

सामाजिक समरसता मंच व शाहू शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र  कार्यकारणी सदस्य श्री नीलेश गद्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजास समता व बंधुत्व या सूत्रीचे आचरण करण्याचे आवाहन केले होते असे मत व्यक्त केले. या वेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे श्री आयु बाळासाहेब बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड येथील शाखा भेटीची माहिती उपस्थिताना करून दिली व बंधुता परिषदेच्या आयोजनामुळे सामाजिक समरसता निर्माण होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले. शाहू शिक्षण संस्थेचे सचिव श्री अभिजीत ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समाजाची वास्तविकता सांगितली,या परिषदेच्या प्रास्ताविकामध्ये सामाजिक समरसता पंढरपूर जिल्हा संयोजक जगदीश बाबर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंढरपूरशी असणारा संपर्क याबद्दल माहिती उपस्थिताना दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक समरसताचे जिल्हा सदस्य दिगंबर साळुंखे व आभार प्रदर्शन सामाजिक समरसता पंढरपूर जिल्हा सह संयोजक अमोल लांडे यांनी केले. कार्यक्रमास मंगळवेढ्याचे नगरसेवक सोमनाथ अवताडे,पंढरपूर जिल्हा संघ चालक डॉ रमेश सिद,जिल्हा कार्यवाह श्री प्रतापसिह टकले तालुका मा संघचालक श्री जोशी काका व्यवस्था प्रमुख श्री सारंग बडोदकर,आदित्य फत्ते पुरकर,नगरसेवक श्रीमंत मस्के,

नगरसेवक श्री अमोल डोके,मा. नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर,श्री किरण सर्वगोड,श्री गुरु दोडिया,श्री अभिजित कांबळे,श्री अभिषेक कांबळे,आदेश कांबळे,लखन क्षीरसागर, तानाजी येडगे,रवी साबळे, दंडे सर यांचेसह नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart