सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता हवी : माजी आम.शहाजीबापू पाटील
माजी आम. शहाजीबापू पाटील , कडलास गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ
*कडलास येथील लेंडवेमळा, गायकवाड वस्ती, करलवस्ती माने- महांकाळवस्ती, येथे गृहभेटी , प्रचार संपन्न
सांगोला/ प्रतिनिधी: पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आपणास सत्ता हवी आहे. सत्तेबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. विधानसभा निवडणुकीपासून दीपकआबांनी तीन वेळा विश्वास गमावला. यापूर्वी पंचायत समितीत स्व.आम. गणपतराव देशमुख व माजी आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांना विचारल्याशिवाय जनतेची कामे होत नव्हती. जनतेच्या कामासाठीच आपल्याला सत्तेत सामील व्हायचे आहे. कडलास गावाला मी माझं गाव मानतो. तालुक्याच्या विकासासाठी माझ्याकडे खूप मोठी दूरदृष्टी असून माझी स्वप्ने वेगळी आहेत. सांगोला तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 1995 व 2019 ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्यामुळे मी जनतेचे उपकार विसरणार नाही .नगरपालिकेत आपली सत्ता आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत ही आपणास सत्ता खेचून आणायची आहे. कडलास गावच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे अभिवचन माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी कडलास येथे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दिले.
कडलास येथील खंडोबा मंदिर, सिद्धनाथ मंदिर व ग्रामदैवतांना नारळ फोडून माजी आम. शाहाजीबापू पाटील, महायुतीच्या शिवसेनेच्या कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे , गणाच्या उमेदवार राणीताई पाटील व मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीराव गायकवाड म्हणाले, महायुती सरकारमुळे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळे सांगोला तालुक्याचे परिवर्तन झाले. सांगोला तालुक्याच्या शेतीचा व पाण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शहाजीबापू पाटील व आमच्या घराण्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. कडलास गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात लीड देऊ असा विश्वास व्यक्त केला
डॉ. विजय बाबर म्हणाले ,आमदार शहाजीबापू पाटील यांनी कडलास गावचा दुष्काळ हाटवला . चंद्र सूर्य असेपर्यंत तालुक्याला कायमस्वरूपी हक्काचं पाणी मिळणार आहे. महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू असा शब्द दिला.
यावेळी सुनीलनाना पवार म्हणाले, राज्यात महायुतीचे विकासाभिमुख सरकार आहे. बापूंनी कडलास गावात खूप विकासकामे केली आहेत. खंडोबा मंदिराचा समावेश ब वर्गात करावा अशी मागणी करीत गेल्या वर्षभरात तालुक्यात कोणतीही ठोस विकास कामे झाली नसल्याची खंत व्यक्त केली. यावर्षी दुष्काळाची चिन्ह आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नाबाबत सर्वांनाच दक्ष राहणे गरजेचे आहे. कडलास येथील लेंडवे मळा गायकवाडवस्ती, करलवस्ती, माने महांकाळवाडी येथे उमेदवारांनी कुटुंबांना भेटी देत प्रचार केला.
यावेळी भाजप -शिवसेना आर .पी. आय. महायुतीतील नेते ,भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीराव गायकवाड, सुनीलनाना पवार ,माजी जि. प. सदस्य अशोक शिंदे, उद्योगपती युवानेते योगेशदादा खटकाळे, सागरदादा पाटील, माजी सरपंच दिगंबर भजनावळे, चेअरमन अनिल खटकाळे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उद्योगपती प्रशांत तेली,ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे, दत्ता गायकवाड, दिगंबर गायकवाड ,तानाजी शिंदे,योगेश गायकवाड, उद्धव गायकवाड, महादेव गायकवाड, शिवाजी ठोकळे ,विजय गायकवाड, गणेश लवटे, भाऊसाहेब खटकाळे, पांडुरंग आसबे, प्रभाकर भगरे योगेश गायकवाड,सुदर्शन लिगाडे, वैभव गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे, जयश्री पवार ,मालन गायकवाड ,प्रणाली शिंदे, वनिता केदार, वर्षा पाटील ,आदी मान्यवर, पदाधिकारी कार्यकर्ते व बंधू-भगिनी प्रचारात सहभागी होते. मान्यवरांनी प्रत्येक कुटुंबाची भेट घेत महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
चौकट: सामाजिक बांधिलकीत आमच्या कुटुंबाचा नेहमी सहभाग असतो. बापू आमदार नसताना आजही विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कडलास गावातील मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांना बहुमताने विजयी करावे : युवानेते योगेशदादा खटकाळे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा