चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्याहस्ते चोपडी -यादवमळा येथे आयोजित केलेल्या हापपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
*स्व. भारत आनंदा यादव यांच्या स्मरणार्थ जाणीव ग्रुपच्या वतीने चोपडी- यादवमळा येथे हापपीच क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
*उपसरपंच पोपटशेठ यादव यांच्यासह जाणीव ग्रुप , मित्रपरिवार व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सांगोला /प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील भाजप -शिवसेना युतीचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा चोपडी जिल्हा परिषद गटात गावभेट दौरा सुरू आहे. सोमेवाडी तालुका सांगोला येथे गावभेट दौऱ्यावर आले असता त्यांनी चोपडी - यादवमळा येथील स्व. भारत आनंदा यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या शुभहस्ते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, चेअरमन दगडू बाबर,यांच्यासह जाणीव ग्रुप व पोपटशेठ यादव मित्रपरिवाराचे सर्व सदस्य, मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते ,युवावर्ग व क्रिकेट खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी जाणीव ग्रुपचे सर्वेसर्वा राजूशेठ यादव, शंकर यादव, विकास गिड्डे, बंडू मेखले, संतोष यादव, जयदीप यादव, बाळासाहेब बाबर, वैभव पाटील, विशाल यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
चोपडी येथील जाणीव ग्रुपच्या वतीने स्व. भारत आनंदा यादव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य हापपीच क्रिकेट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. भारत आनंदा यादव हे चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांचे बंधू होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या क्रीडा स्पर्धेला ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. भारत आनंदा यादव यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक जिव्हाळ्याच्या स्वभावाची व कार्याची आठवण करून दिली. यावेळी चोपडी गावातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा