Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री काशी विश्वनाथ मंदिर व श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिर वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मी दहिवडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..*

*श्री काशी विश्वनाथ मंदिर व श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिर वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मी दहिवडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..*
सांगोला प्रतिनिधी 
        श्री  काशी विश्वनाथ मंदिर व श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त वेद वेदांताचार्य श्री गुरु गुरु सिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कमळ स्वामी दहिवडकर मठ जोंधळे वस्ती लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      शनिवार दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता श्री काशी जगद्गुरु चे लक्षण दहिवडी येथे आगमन रथोत्सव, दर्शनाशीर्वाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रसंगी मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महाराज, शिवलिंग शिवाचार्य बेळंकीकर महाराज, शिवाचार्य सिद्धनकेरी महाराज व निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य कोळेकर महाराज हे शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार समाधान दादा अवताडे, ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराज, डॉक्टर शैलेश पाटील हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत. यामध्ये वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री सोलापूर यांचा विशेष सत्कार होणार आहे. 
    रविवार दिनांक 07 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता लिंग दीक्षा कार्यक्रम यासाठी बाळासो जोंधळे मोबा. 99 230 75 532 व महेश वाईकर मोबा. 93 70 58 52 95 यांचेकडे संपर्क साधावा. तसेच ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्री क्षेत्र वाराणसी यांची भव्य महापूजा तसेच सकाळी 11 वाजता धर्मसभा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सदभक्तांनी जगद्गुरु च्या दर्शनाचा व आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दहिवडकर मठाचे शिष्य, भक्तमंडळी व समस्त ग्रामस्थ लक्ष्मी दहिवडी यांनी केले आहे.

No comments