अशोक बंडगर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड.
सांगोला तालुका राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवड मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता .यावेळी अशोक ज्ञानू बंडगर यांची एकमताने अध्यक्षपदी व राधिका अशोक दबडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .
चरण वाघमारे, पूजा बंडगर, सचिन काळे, जयश्री दबडे, शोभा दबडे, दादासो दबडे, संगीता सावंत ,महादेव बंडगर ,मारुती सुतार, चांगुना दबडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली तसेच किसन बंडगर यांची शिक्षण तज्ञ म्हणून निवड केली गेली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक वर्ग उपस्थित होता ही निवड मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कंराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.आप्पासाहेब व्हळगळ,भारत काटे, महेश काटे,आनंदा बंडगर, सुकदेव खुळे,दिलीप दबडे या वेळी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा