चोपडी येथील प्रतीक दत्तात्रय बाबर यांची सैन्यदलात अग्निवीर टेक्निकल पदावर निवड
चोपडी येथील प्रतीक दत्तात्रय बाबर यांची सैन्यदलात अग्निवीर टेक्निकल पदावर निवड
*श्री. भोजलिंग यात्रा कमिटी रानमळा चोपडी यांच्यातर्फे सत्कार संपन्न
सांगोला /प्रतिनिधी: चोपडी गावचे सुपुत्र प्रतीक दत्तात्रय बाबर यांची ई .एम.ई सेंटर सिकंदराबाद येथे अग्नीवर टेक्निकल पदावर निवड झाली आहे. प्रतीक बाबर यांचे वडील दत्तात्रय तुकाराम बाबर हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जिद्द आणि चिकटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नांमध्ये प्रतीक बाबर यांनी हे संपादन केले आहे. श्री. भोजलिंग यात्रा कमिटी रानमळा -चोपडी यांच्यावतीने प्रतीक बाबर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रानमळा येथील अनेक मान्यवर, महिला भगिनी, युवावर्ग उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर ,सेवानिवृत्त सैनिक चंद्रकांत बाबर, दिलीप बाबर गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून प्रतीक बाबर यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करीत एका सर्वसामान्य कुटुंबातील सुपुत्र प्रतीक बाबर यांनी कुटुंबाचा व गावाचा नावलौकिक केला त्याबद्दल अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रतीक बाबर म्हणाले, कोणतेही यश मिळवण्यासाठी जिद्द ,आत्मविश्वास व चिकाटी महत्त्वाची आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये माझी सैन्य दलामध्ये अग्नीवर टेक्निकल पदावरती निवड झाली आहे. तरुणांनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करावी असा मौलिक विचार मांडला. परिसरातील ग्रामस्थ व महिला युवावर्ग यांनी केलेल्या सत्काराबद्दल प्रतीक बाबर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

No comments