सांगोला नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक २ ब सर्वसाधारण महिला जागेसाठी शिवसेनेकडून वैशाली सतीश सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगोला नगरपरिषद निवडणूक २०२५
प्रभाग क्रमांक २ ब सर्वसाधारण महिला जागेसाठी शिवसेनेकडून वैशाली सतीश सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगोला/ प्रतिनिधी :सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ला सुरुवात होत असताना शहरात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक २ ब मधील सर्वसाधारण महिला जागेसाठी शिवसेना पक्षाकडून वैशाली सतीश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात जोरदार प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांच्या सुविद्य पत्नी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली सावंत यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नागरीक आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना पदाधिकारी व समर्थकांसह त्यांनीअंबिका मातेचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था तसेच महिलांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार असल्याचे सावंत यांनी सांगितले. "सांगोला शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभागातील प्रत्येक घटकाचा सन्मान हेच माझे ध्येय असून नागरिकांचा विश्वास माझी खरी ताकद आहे. प्रभाग क्रमांक २ ब मधून जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने आपण विजयी होऊ," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैशाली सावंत यांच्या उमेदवारीला शिवसेना पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे यावेळी दिसून आले. सावंत यांचा प्रचार आगामी दिवसांत अधिक जोम पकडणार असून प्रभागातील निवडणूक वातावरणात चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे.




No comments