नाझरे येथे वीरभद्र जयंती उत्सवास भक्ती भावाने सुरुवात..*
*नाझरे येथे वीरभद्र जयंती उत्सवास भक्ती भावाने सुरुवात..*
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे वीरभद्र जयंती उत्सवास मोठ्या भक्ती भावाने सुरुवात झाली असून, सप्ताहात परम रहस्य ग्रंथाची पारायण, शिवपाठ, भजन, प्रवचनाचा आरंभ झाला. यावेळी वेद वेदांताचार्य श्री श्री श्री 108 गुरु सिद्ध मनीकंट शिवाचार्य महाराज यांचे स्वागत पत्रकार रविराज शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीस सेवानिवृत्त शिक्षक शिवया स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. तर दरवर्षीपेक्षा यंदाची जयंती अभिमानाची व गौरवाची आहे कारण बार्शी व लक्ष्मी दहिवडी मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्ध मणिकंठ शिवाचार्य महास्वामींना वेदांत विषयात प्रथम क्रमांक मिळवत तीन सुवर्ण पदकाची सुवर्ण कीर्ती मिळवली आहे व या गौरवशाली प्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि विद्यापीठाचे कुलपती यांच्या हस्ते महास्वामींना तीन सुवर्णपदके प्रदान करण्यात आले आहेत. व विशेष बाब म्हणजे गुरुपरंपरेचा आदर्श राखत महास्वामिनी काशीच्या जंगमवाडी मठात जाऊन ही सुवर्णपदके काशी महास्वामीच्या चरणी अर्पण केली व त्याचा नाझरे, वझरे व कारंडेवाडी येथील भक्तगणांना या गौरव परंपरेचा अभिमान व आनंद होत आहे व त्यामुळे जयंती ही अभिमानाची व गौरवाची आहे असे वाटते असे पत्रकार रविराज शेटे यांनी सांगितले.
दान धर्म करणारे हात सुंदर असतात व यासाठी प्रत्येकाने दान करणे गरजेचे आहे तसेच खोटे बोलणे पाप आहे व अधर्म आहे आपली वाणी हेच आपले आभूषण आहे असे महास्वामिनी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी महास्वामींची आरती सौ व श्री अशोक पाटील तसेच व सौ व श्री महेश चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला.




No comments