Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका शिवसेना ताकतीने लढवणार आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार खासदार डॉ श्रीकांत शिंदे

 



सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका शिवसेना ताकतीने लढवणार आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

(मुंबई येथील सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूक आढावा बैठक संपन्न )

आज मुंबई येथे शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका यांचा सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांच्या जंजिरा बंगल्यावर सांगोला तालुक्याचा आढावा घेत असताना माननीय माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका ताकतीनिशीन लढू व कार्यकर्त्यांना न्याय देऊन विजयश्री खेचून आणू असा शब्द दिला यावेळी  पक्षाचे नेते डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी आमचे नेते शहाजीबापू असून बापूंसाठी सर्व ताकदीनिशी शिवसेना व शिंदे कुटुंब पाठिमागे राहील असा शब्द दिला यावेळी पक्षाचे नेते आमदार विजय बापू शिवतारे यांनी सांगोला तालुक्यामध्ये आवश्यक निवडणुकीसाठी लागणाऱ्या तयारीचा आढावा घेतला यावेळी पक्षाची सचिव संजय मोरे भाऊसाहेब चौधरी नीलम ताई गोरे अन्य नेते उपस्थित होते सांगोला तालुक्याच्या वतीने प्राध्यापक संजय देशमुख सर यांनी नगरपालिका विभागाचा आढावा मांडला तसेच अन्य नेत्यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी या बैठकीस युवासेनेची जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील तालुका प्रमुख दादासाहेब लवटे विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख गटनेते आनंदा भाऊ माने उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील युवासेना  प्रमुख गुंडादादा खटकाळे, दीपक दिघे ,आनंदा घोंगडे ,प्रशांत धनवजीर,अस्मिर तांबोळी ,माऊली तेली ,सोमेश यावलकर ,ज्येष्ठ नेते विजय दादा शिंदे ,समीर पाटील, अजिंक्यराणा शिंदे, रवी शिंदे,  अमित पाटील ,दादासाहेब काळे ,राजेंद्र हजारे भाळवणी गटाचे नेते धनंजय काळे , महूद गावचे  नेते संजय मेटकरी व  शिवसेना पक्षाचे  पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत भूतनिहाय वाढ न्याय चर्चा होऊन सर्वसमतीने बैठक पार पडली.

No comments