उदनवाडी येथे कार्तिक वारी पायी दिंडी अन्नदान सोहळा व आरोग्य शिबिर .
उदनवाडी येथे कार्तिक वारी पायी दिंडी अन्नदान सोहळा व आरोग्य शिबिर .
वाटंबरे /प्रतिनिधी:
उदनवाडी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिक वारीस येणाऱ्या वारकऱ्यांसाठी उदनवाडी ग्रामस्था तर्फे अन्नदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा गोवा, इचलकरंजी, कर्नाटक, मिरज, तसेच विविध भागातून पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकरी बंधू व भगिनींनी लाभ घेतला तसेच उदनवाडी ग्रामस्थाांनी अन्नदान व आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या सोहळ्यामध्ये मायाक्कादेवी ओविकार मंडळ उदनवाडी या ओविकार मंडळाने ओवीचा कार्यक्रम सादर केला, विविध भागातून आलेल्या वारकरी बंधू भगिनींनी अभंग सादर केले, वारकरी बंधू व भगिनींनी सर्व उदनवाडी व उदनवाडी परिसरातील भाविक भक्तांचे कार्तिक वारी पायी दिंडी अन्नदान सोहळा व आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानून समाधान व्यक्त केले. ह्या कार्तिक वारी पायी दिंडी अन्नदान सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी यथाशक्ती देणगी दिली तसेच वारकरी भावीक भक्त बंधू भगिनींची सेवा करून मोलाचे सहकार्य केले. तसेच सर्व भाविक भक्तांनी इथून पुढच्या काळामध्येही दरवर्षी कार्तिक वारी पायी दिंडी सोहळा आनंदाने व भक्तीभावाने करण्याचा संकल्प केला. कार्तिक वारी पायी दिंडी सोहळ्यामुळे उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले होते.



No comments