Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

ई-पीक पाहणी नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे वाटंबरे परिसरातील शेतकरी अडचणीत.

 ई-पीक पाहणी नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे वाटंबरे परिसरातील शेतकरी अडचणीत.



वाटंबरे/प्रतिनिधी :

महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा मोबाईल वरून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

परंतु या सुविधेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होत आहे. या ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत सतत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांतून  तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  या सुविधेचा वापर करताना  शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता करता अनेक वेळा संगणक प्रणाली ठप्प होणे, संकेतस्थळावर प्रवेश न मिळणे, माहिती अपलोड न होणे ग्रामीण भागात इंटरनेट सेवा खंडित होणे अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.

"सरकारने कागदविरहित व्यवस्था आणली खरी या व्यवस्थेने फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होत आहे या मध्ये वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाते," अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ई पीक पाहणी पूर्ण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवायचे असेल, तर ई-पीक नोंदणीची तांत्रिक व्यवस्था तत्काळ सुरळीत करावी," अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.


चौकट: मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप मध्ये सर्व माहिती भरल्यानंतर पिकाचे छायाचित्र काढत असताना सदरचे शेत जमिनीचे लोकेशन त्या ठिकाणापासून तिनशे ते चारशे मीटर दूर अंतरावर दाखवत असल्याने पिकाचे छायाचित्र घेण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे त्यामुळे ई पीक पाहणी करण्यास वेळ लागत आहे तसेच मोठ्या प्रमाणात मनस्तापही सहन करावा लागत आहे तरी प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून ही तांत्रिक अडचण दूर करावी. 


वाटंबरे शेतकरी

शरद महादेव पवार.


No comments