Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सांगोला तालुक्यातील पुरग्रस्त बाधितांना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टीच्या वतीने आरोग्य सेवा व उपचार संपन्न.

 *सांगोला तालुक्यातील पुरग्रस्त बाधितांना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टीच्या वतीने आरोग्य सेवा व उपचार संपन्न.



 चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी आणि ढगफुटी मुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी व सामान्य नागरिक हवालदिल झाले असून अनेक पूरग्रस्त ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. अशावेळी जीवाणू व विषाणूंचा संसर्ग होऊन साथीचे आजार होऊन ग्रामस्थांचें आरोग्य धोक्यात आले होते. गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.मौजे कडलास येथे पूरग्रस्त बाधित नागरिकांना आरोग्य सेवा व उपचार देण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख  यांच्या मार्गदर्शनाने स्व. गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशन संचलित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी,सांगोला यांच्या वतीने आरोग्य सेवा व उपचार देण्यात आले.या आरोग्य शिबिरामध्ये स्वतः स्त्रीरोग तज्ञ डॉ.निकिता ताई देशमुख यांनी उपस्थित राहून आरोग्य सुविधा पुरवली त्यांच्यासोबत डॉक्टर्स ,सुसज्ज मेडिकल टीम, ॲम्बुलन्स उपस्थित होते तसेच औषधे वाटप करून गरजूंना इंजेक्शन सलाईन या सुविधा पुरवण्यात आल्या. 


या आपत्कालीन परिस्थिती मध्ये जवळपास ८० ते ९०  पुरग्रस्त बाधितांनी उपचाराचा लाभ घेतला,लहान मुले मुली, वयोवृद्ध नागरिक ,गरोदर माता भगिनी, तरुण पुरुष महिलावर्ग यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. दिलेल्या आरोग्य सेवा व उपचार याबद्दल पूरग्रस्त नागरिकांनी त्समाधान व्यक्त केले.. या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व उपचार वेळी डॉ. निरंजन केदार ,श्री.समाधान पवार चेअरमन, श्री.बंडू लवटे माजी उपसरपंच , छावा संघटना प्रवक्ता  श्री.प्रविण घाडगे पाटील,श्री.निलेश अनुसे ग्रामपंचायत सदस्य, श्री.शिवशंकर ननवरे ,कडलास गावच्या तलाठी इनामदार मॅडम, श्री.बजरंग कोळी ,श्री.सचिन चांदणे धनराज ॲम्बुलन्स  ),श्री.अनिल बागडे तसेच मोठ्या संख्येने पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.







No comments