Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांना कोसळले रडू

 शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांना कोसळले रडू


वाटंबरे (प्रतिनिधी):





वाटंबरे (प्रतिनिधी):

वाटंबरे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाना १८ तारखेला प्रशासकीय बदलीचे आदेश देत १९ तारखेला बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या आदेश देण्यात आले होते आपल्या लोकप्रिय शिक्षकाची बदली होणार असं कळताच विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणाऱ्या या शिक्षकांना गमवावे लागणार या भावनेने शाळेचे वातावरण अश्रूंनी भारावून गेले होते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक तसेच सामाजिक जाणिवांचा परिचय करून देत मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी गावातील शेकडो मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला होता. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीच्या वाटेवर आले. म्हणूनच बदलीचा आदेश लागल्याची बातमी समजताच मुलांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला.

काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या पायाशी बसून त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांनी “सर, आम्हाला सोडून जाऊ नका” अशी विनवणी केली. या प्रसंगामुळे शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू दाटून आले.


दरम्यान, संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धीर देत आपली बदली सेवा हीच व्यवस्था असल्याचे समजावले. “नव्या ठिकाणीही मुलांसाठी तितक्याच जबाबदारीने कार्य करणार,” असे आश्वासन देत त्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांचे अश्रू अखेर ओघळल्याशिवाय राहिले नाहीत.


चौकट:

 बदलीच्या दिवशी शाळेतून शिक्षक निरोप घेत असताना विद्यार्थ्यांच्या आपले अश्रू अनावर झाले होते यावेळी सर्व विद्यार्थी सर आम्हाला सोडून जाऊ नका असे रडत विनवणी करत होते यावेळी शिक्षकांनाही आपले अश्रू अनावर झाले तसेच यावेळी शिक्षकांना निरोप देण्यासाठी पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

या घटनेतून शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील घट्ट नाते, भावनिक बंध आणि जिव्हाळा पुन्हा अधोरेखित झाल्याचे पाहायला मिळाले.





No comments