Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

सांगोला येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने घटस्थापना ते विजय दशमी दसरा या कालावधीत दुर्गामाता दौड चे आयोजन*

 *सांगोला येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने घटस्थापना ते विजय दशमी दसरा या कालावधीत दुर्गामाता दौड चे आयोजन*




   श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मार्फत संपूर्ण महाराष्ट्र श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते.“दुर्गामाता दौड” -म्हणजे शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक.“दुर्गामाता दौड” या शब्दातच या शब्दाची ताकत आणि सारा अर्थ सामावलेला आहे. अशा या दुर्गामाता दौडचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सांगोला विभाग यांच्या मार्फत घटस्थापना २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे सकाळी ठीक सहा वाजता दुर्गा माता दौड सुरू होईल.

        पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा संकट येते, जेंव्हा जेंव्हा म्लेंच्छाची गर्दी होते तेंव्हा तेंव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या नावाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत सुरु केलेली हि दौड म्हणजे हिंदूधर्म रक्षितेच प्रतिक, शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा, आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक या दुर्गा माता दौडमध्ये दिसते.शिवरायांसारखं रत्न या भारतभूमीला लाभण, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येण हि साधी सोपी गोष्ठ नाही. हा एक ज्वलंत इतिहास पराक्रमाचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा, या सह्याद्रीचा आणि सह्याद्रीत छातीची ढाल करणाऱ्या मावळ्यांचा संघर्ष यातुन प्रेरणा घेऊन या दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.


          आपल्या सांगोला शहरात व विविध गावात मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढली जाते. श्री दुर्गा माता दौड ही घटस्थापना ते विजयादशमी दसरा म्हणजेच दिनांक- २२ नोव्हेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत आयोजित केली जाते. ही श्री दुर्गा माता दौड ११ दिवस रोज सकाळी ६ ते ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथून सांगोला शहरातील विविध मार्गाने जाते. तरी सांगोल्या शहरातील जास्तीत जास्त माता बंधू आणि भगिनींनी या दुर्गामाता दौडीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सांगोला विभाग यांच्यामार्फत करण्यात येते.संपर्क 77410 50601,9175941221,8408087054.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart