Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १४ जून, २०२५

डिजिटल मीडियाला राजमान्यता हा समाज व पत्रकार यांच्यासाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय: राजा माने

 .डिजिटल मीडियाला राजमान्यता हा समाज व पत्रकार यांच्यासाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय: राजा माने 

 






डिजिटल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील पत्रकारांना पदाधिकारी निवडीचे पत्र प्रदान 

दीपक ऐवळे, दीक्षा चंदनशिवे यांची तालुकाध्यक्षपदी, तर सचिवपदी दादासाहेब इंगोले यांची निवड.

प्रतिनिधी/ प्रतिनिधी: डिजिटल मीडिया देशात एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे.  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला राजमान्यता दिली आहे. पत्रकारांच्या व समाजाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. यासाठी आम्ही सरकारला गाईडलाईन दिलेल्या आहेत. डिजिटल मीडियाने आता बाळशे धरले आहे. सर्वसामान्य डिजिटल मीडिया पत्रकारांना सोबत घेऊन संघटना महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.  पत्रकार म्हणून समाजात पुढारपण करण्यापेक्षा पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे. डिजिटल पत्रकार नेमकं कोणाला म्हणायचे यासाठी शासन दरबारी नियम लावण्यात येणार आहेत. मागील पाच वर्षात डिजिटल मीडियाने महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. भविष्यात डिजिटल मीडिया पत्रकार संघटना निश्चितपणे सामाजिक व वैयक्तिकदृष्ट्या निश्चितपणे नवलौकिक  करेल. असे विचार महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा माने यांनी सांगोला येथे व्यक्त केले. 

सांगोला तालुक्यातील डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडी शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष राजा माने व पोलीस निरीक्षक विनोद घुगे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या शुभहस्ते डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांना पदाधिकारी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सानिका सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना राजा माने म्हणाले, दैनिक सांगोला नगरीचे व माणदेश नगरीचे संपादक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी सांगोला तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी व या डिजिटल मीडिया संघटनेसाठी खूप मोठे योगदान दिले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सतीशभाऊ सावंत यांचा सातत्याने लढा सुरू असतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना पत्रकार बांधवांनी एका विशिष्ट चाकोरीत राहून सामाजिक जबाबदारी व विषय हाताळले पाहिजेत. समाजासाठी आपली खूप मोठी जबाबदारी आहे. तसेच आपल्या कुटुंबासाठीही आपण महत्त्वाचा घटक असल्याने आपणास समाज व कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणे गरजेचे आहे. डिजिटल मीडियाला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले, डिजिटल मीडिया संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजा माने व आमचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काम करीत असताना आपल्या हातून चांगलेच काम व्हावे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करून आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला पाहिजे. सांगोला तालुक्यात पदभार घेतल्यापासून मी अतिशय धाडसाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहे. पत्रकारांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात निपक्षपातीपणे  जबाबदारी पार पाडली पाहिजे. अडचणीतून मार्ग काढीत जीवनात वाटचाल करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार कैलास गोरे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कोरोना काळात पत्रकार टीमने खूप मोठे योगदान दिले आहे. भविष्यात आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या दृष्टीने पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे. संघटनेच्या माध्यमातून विचार विनिमय व कार्य प्रणाली ठरवून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

यावेळी डिजिटल मीडिया पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. यामध्ये दीपक ऐवळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महिला तालुकाध्यक्षपदी दीक्षा चंदनशिवे यांची निवड करण्यात आली. चांदभैय्या शेख यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर कैलास गोरे उपाध्यक्ष ,जगन्नाथ साठे उपाध्यक्ष, दत्तात्रय पवार उपाध्यक्ष, दादासाहेब इंगोले सचिव ,दशरथ बाबर कार्याध्यक्ष, रोहित हेगडे खजिनदार, सुनील वाघमोडे सहखजिनदार, सचिन धांडोरे सहसचिव, समाधान धांडोरे सह खजिनदार या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्यांमध्ये विकास वाघमारे, नितीन होवाळ ,मोहसीन मुलाणी, सचिन कुंभार ,पांडुरंग ऐवळे, संतोष साठे, शुभम ऐवळे ,शब्बीर मुलाणी, बबन चव्हाण, पवन बाजारे, शशिकांत बनसोडे, अमोल महारनवर, चंद्रशेखर केंगार, स्वप्नील करडे, प्रवीण शिवपुजे, विनोद चंदनशिवे, सचिन गायकवाड, अशोक पवार, रोहित हेगडे, करण मोरे ,शंकर काळे यांची निवड केली आहे.

यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार बांधवांनी आपल्या पदाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा. संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना व पत्रकार बांधवांना मान्यवरांकडून सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे उपस्थित होते नितीन रणदिवे यांच्याकडून नूतन अध्यक्ष दीपक ऐवळे व महिला अध्यक्षा दीक्षा चंदनशिवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील वाघमोडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.


‼️‼️‼️‼️‼️‼️

📡*Khabardar News* 

🔰बातमी जाहिरातीसाठी.

🔰संपर्क: दत्तात्रय पवार.

 📱मो: *8007913668* 

📡📡📡📡📡📡

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart