नाझरे वझरे गावातुन शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध.
नाझरे वझरे गावातुन शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध.
सांगोला तालुक्यातून १६६ नंबर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गा नंतर शासनाचा महत्त्वकांक्षी शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे चालू आहे पण या सर्वेला सांगोला तालुक्यातील नाझरे वझरे गावातून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे या महामार्गामुळे नाझरे वझरे गावातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी देशोधडीला लागणार आहेत व त्यांचे उपजीविकेचे साधन ही संपणार आहे त्यामुळे या भागातील शेतकरी या शक्तिपीठ महामार्गास विरोध करत आहेत .शुक्रवार दि.६ जून रोजी नाझरे वझरे येथील शेतकऱ्यांनी सांगोलचे तहसीलदार संतोष कणसे , आ. बाबासाहेब देशमुख ,आ. शहाजी बापू पाटील ,आ. दीपक आबा साळुंखे यांना या संदर्भात निवेदन दिले तसेच या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांत अधिकारी मंगळवेढा यांना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

No comments