गेट-टुगेदरच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्रशालेस दिली वृक्षांची भेट
गेट-टुगेदरच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्रशालेस दिली वृक्षांची भेट
वाटंबरे /प्रतिनिधी:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून २००३-४ या वर्षीच्या वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक आगळीवेगळी भेट दिली.
या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक भेटवस्तू किंवा सजावटीऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेस विविध प्रकारच्या वृक्षांची भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी फलदायी व छायादायी अशा विविध प्रजातींची झाडे भेट दिली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता पवार व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी केलेले या उपक्रमाचे कौतुक केले . प्रशालेच्या मुख्याध्यापीका निता पवार यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, "आजच्या पिढीकडून मिळालेली ही हिरवी भेट केवळ शाळेस नव्हे, तर पर्यावरणासाठीही अमूल्य आहे." या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबतची जाणीव आणि जबाबदारी अधोरेखित केली असून, समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थिती विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला गेला.

No comments