Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला शहर पदाधिकारी निवडी संपन्न

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला शहर पदाधिकारी निवडी संपन्न



*सांगोला शहराध्यक्षपदी संतोष साठे तर सचिवपदी पवन बाजारे यांची निवड

सांगोला/प्रतिनिधी:

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगोला शहर  पदाधिकाऱ्यांच्या निवडी शुक्रवार दिनांक 20 जून रोजी दैनिक सांगोला कार्यालयामध्ये संपन्न झाल्या आहेत. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांमध्ये सांगोला शहर अध्यक्ष संतोष साठे, उपाध्यक्ष चंद्रकांत ऐवळे, सचिव पवन बाजारे, कार्याध्यक्ष शुभम ऐवळे, कोषाध्यक्ष सुनील वाघमोडे , सरचिटणीस पांडुरंग ऐवळे, सहसचिव सिद्धेश्वर माने, समन्वयक नूर बागवान, खजिनदार शब्बीर मुलाणी यांची संघटनेच्या पदाधिकाऱी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पत्रकार बांधवांना संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांच्या हस्ते पदाधिकारी निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या संघटनेच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पत्रकार बांधव प्रयत्नशील आहेत. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी ही संघटना काम करेल असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी सांगितले आहे.




No comments