पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते अजनाळे येथे वृक्षरोपण..
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते अजनाळे येथे वृक्षरोपण..
शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सरपंच अनिता पवार , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व इतर मान्यवर.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला पोलिस स्टेशन व अजनाळे ग्रामपंचायत यांचा संयुक्त विद्यमाने
शुक्रवार दि २० जुन रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथे सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद घुगे व ग्रामपंचायत सरपंच अनिता पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सुमारे ३०ते ३५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये चिंच,वड,निंब,पिंपळ,करंज इत्यादी वृक्षांची लागवड केली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, सोमनाथ खंडागळे,माणिक कोळवले, एकनाथ गुरव, पोलीस पाटील संतोष भंडगे, समाधान येलपले, नवनाथ इंगोले,पुजा पोतदार, कृषी सहाय्यक विवेक पाटील, दादा गाडे, चंद्रकांत पवार, यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने हजर होते.

No comments