Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

कोळा विद्यामंदिर परिवारामध्ये प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांचा सत्कार संपन्न* (बापूसाहेबांचा आदर्श व गुणवत्तेनुसार कार्यरत असणारी संस्था- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर )

*कोळा विद्यामंदिर परिवारामध्ये प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांचा सत्कार संपन्न*

 बापूसाहेबांचा आदर्श व गुणवत्तेनुसार कार्यरत असणारी संस्था- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर   
 कोळा :- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांना त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय कार्याची दखल घेऊन दैनिक सकाळ गौरवगाथा 'गौरव भूमिपुत्रांचा प्राईड ऑफ सोलापूर' व दै. दिव्य मराठी 'पॉवर 50 सोलापूर जिल्हा' या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. त्यानिमित्त कोळा विद्यामंदिर परिवारामध्ये प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांच्या हस्ते शाल व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक लिंगायत महासभा सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.श्री रविराज शेटे सर यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
 सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष साहेबांनी आपल्या मनोगतात बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत बापूसाहेबांचा आदर्श व गुणवत्तेवर आजपर्यंत संस्था कार्यरत आहे. त्यामुळे आज गुणवत्तेचे शिखर प्राप्त केले आहे. त्यांनी ग्रामीण आणि उजाड माळारानावर लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे म्हणाले. रविराज शेटे यांनी आपल्या मनोगतात झपके कुटुंबीय व विद्यामंदिर परिवाराचा आपल्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा असल्याचे सांगत. झपके कुटुंबीय व संस्थेच्या ऋणात राहणे पसंत केले.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य श्रीकांत लांडगे सर यांनी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे शैक्षणिक कार्य व संस्थेने आत्तापर्यंत केलेली प्रगती विद्यार्थ्यांसमोर मांडली. यावेळी मारुती सरगर सर यांनी मनोगत व्यक्त करताना गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याची माहिती सांगितली.त्याचप्रमाणे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करत आहेत त्यामुळे संस्थेने उल्लेखनीय अशी प्रगती केली आहे असे म्हणाले.
 सदर कार्यक्रमास प्राचार्य श्रीकांत लांडगे सर पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर, इंग्लिश मेडीयम स्कूलचे मुख्याध्यापक विनोद देशमुख सर, माजी शिक्षक महादेव नरळे सर सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक सरगर सर यांनी केले.

No comments