श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यू. कॉलेज ,वाटंबरे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
👉🏻वाटंबरे (21 जून)-
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यू. कॉलेज ,वाटंबरे येथे शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 'एक पृथ्वी एक आरोग्य ' या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन करण्यात आले. योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात करत असताना विविध पुरक हालचाली, आसने , प्राणायाम व ध्यानतंत्रे प्रात्यक्षिकांद्वारे सादर केली .मानवी जीवनात शारीरिक , मानसिक, आध्यात्मिक पातळीवर योगासनांमुळे सकारात्मक बदल घडून येतात .योग ही आपल्या देशाला पूर्वजांकडून मिळालेली एक दैवी देणगी आहे . योग केल्याने मन सक्षम तर होतेच त्याचबरोबर वाईट प्रवृत्तींवर मात करता येते असे मत प्रशालेच्या प्राचार्या /मुख्याध्यापिका नीता पवार मॅडम यांनी मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली . त्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांनी विविध आसने, सूर्यनमस्कार , प्राणायाम , योगामुळे शरीराला होणारे फायदे जाणून घेत प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . प्रशालेचे क्रीडा शिक्षक चव्हाण सर ,घाडगे सर यांनी विविध आसने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून दाखवली व त्यांचे महत्त्व, होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. मोठ्या आनंदी वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी डी पवार सर यांनी केले. दररोज थोडा वेळ काढून योगा करण्याचे आवाहन या योग दिनाच्या निमित्त्याने करण्यात आले .प्रशालेचे पर्यवेक्षक शिवशरण सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.


No comments