Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जुनियर कॉलेज प्रशालेत नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्स्फूर्त स्वागत.


     



   श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे येथे सोमवार दिनांक 26 जून रोजी "शाळा प्रवेशोत्सव"विविध उपक्रमांनी व मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेविषयी विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळेचा उंबरठा ओलांडून ज्ञान मंदिराकडे येणाऱ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावीपणे व दर्जेदार कार्यक्रमाने करण्यात आले 
          प्रवेशोत्सवाच्या शुभमंगल क्षणांची सुरुवात दीपप्रज्वलनाने व ज्ञानदीप प्रज्वलित करून ज्ञानज्योती अखंड सेवा ठेवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय मोहनराव पवार तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थ्यांचे पालक खास करून महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते 
 प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निता पवार मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत प्रशालेत नव्याने दाखल झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे सहर्ष स्वागत केले .शाळेत वर्षभर घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा त्याचबरोबर शालेय नियमांचे पालन करत आनंददायी शिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले 
         या शुभप्रसंगी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या "गणित प्रज्ञा परीक्षेत "प्रज्ञापात्र विद्यार्थिनी कुमारी आरोही यशवंत चव्हाण इयत्ता सहावी हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सर्व उपस्थित मान्यवर ,पदाधिकारी ,पालक यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला इयत्ता पाचवी मध्ये दाखल झालेल्या नवागतांचे स्वागत क्रमिक पुस्तके व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या आनंदाच्या प्रसंगी मुलांना पेढे वाटप करण्यात आले 
        विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व आनंददायी आणि उत्सुकतापूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वरती पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात पालक व विद्यार्थी यांना सजावट केलेल्या वर्ग खोल्यांमध्ये देण्यात आले फुलांनी ,फुग्यांनी, पताकांनी व आकर्षक शैक्षणिक साहित्यांनी सजवलेल्या वर्ग खोल्यांमध्ये फुगे फोडण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने वर्ग प्रवेश केला
        अशा या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी .पवार सर यांनी केल

        विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व आनंददायी आणि उत्सुकतापूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वरती पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात पालक व विद्यार्थी यांना सजावट केलेल्या वर्ग खोल्यांमध्ये नेण्यात आले फुलांनी ,फुग्यांनी, पताकांनी व आकर्षक शैक्षणिक साहित्यांनी सजवलेल्या वर्ग खोल्यांमध्ये फुगे फोडण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने वर्ग प्रवेश केला
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी .पवार सर यांनी केले. उपस्थित मान्यवर उपस्थित मान्यवर पदाधिकारी व पालक यांचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री शिवशरण सर यांनी केले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या वाटचालीस सर्वांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments