दहावीच्या परीक्षेत बलवडीच्या ओमराज शिंदेचे यश .
दहावीच्या परीक्षेत बलवडीच्या ओमराज शिंदेचे यश .
वाटंबरे /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल खामकरवाडी तालुका वाशी, जिल्हा धाराशिव या शाळेतील विद्यार्थी ओमराजे शिंदे या विद्यार्थ्याने ९६.४०% गुण मिळवत यश प्राप्त केले . त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन हेच प्रमुख घटक असल्याचे त्याने सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन करताना सांगितले की, “ ओमराज शिंदे यांने खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे हे यश प्रेरणादायी आहे.”
त्याचे मुळगाव बलवडी येथील भारतीय जनता पार्टीचे आनंद सुखदेव सोनवर मित्र परिवाराच्या वतीने त्याचे अभिनंदन केले जात आहे.

No comments