आरोग्य हीच खरी संपत्ती असते: मुख्याध्यापक हरिभाऊ भगत .
आरोग्य हीच खरी संपत्ती असते: मुख्याध्यापक हरिभाऊ भगत .
{श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी येथे 10 वी बॅच सन 2001-2002 विद्यार्थी व शिक्षक स्नेहसंमेलन संपन्न}
वाटंबरे /प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांनी आपले जीवन जगत असताना व्यसनापासून दूर राहण्याचा मौलिक सल्ला देत माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो पण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही माणसाजवळ पैसा मुबलक येतो पण शरीर साथ देत नाही निरोगी शरीरापेक्षा कोणतीही मोठी संपत्ती नाही पुढे बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भगत सर यांनी पैशापेक्षा शरीर ,मित्र परिवार, नातेवाईक, हे महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी या प्रशालेचे मुख्याध्यापक मा. राजाराम वलेकर सर, स्वामी सर, सावत सर, एच वाय सावंत सर, ऐवळे सर, नंदकुमार घाडगे सर, भगत सर, राऊत सर,ज्ञानू कोंडीबा वलेकर सर, काळोबा टिंगरे ( शिपाई), प्रभाकर गाडे (शिपाई) हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मृत पावलेल्या माजी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, वीर जवानांना, श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचा, माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा, इयत्ता 10 वी बॅच 2001-2002 ह्या बॅचमधील सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करून आलेले माजी सैनिक विद्यार्थी संभाजी सरगर तसेच सध्या मुंबई येथे शासकीय सेवेत असलेले विशाल विरकर या मान्यवरांचा सत्कार श्रीफळ ,फेटे , शाल,देऊन करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परिचया बरोबर आपल्या प्रापंचिक जीवनाचा परिचय करून देऊन सर्वांनी आपली ओळख करून दिली. तसेच सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये एकमेकांच्या सुखदुःखात जाण्याचे आवाहन केले,त्यानंतर नंदकुमार घाडगे सर, स्वामी सर, सावत सर, एच वाय सावंत सर, ऐवळे सर या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी आपल्या मनोगतातून आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. नेहमी सर्वांचा आदर करा, आई-वडिलांचा आपल्या गुरुजनांचा आदर करा , असा मोलाचा सल्ला दिला तसेच 25 वर्षानंतर सर्वांशी भेट झाल्याने समाधान व्यक्त केले . तसेच इयत्ता 10वी बॅच 2001-2002
या बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दलसर्वांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विशाल गजानन विरकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सौ. सोनाली चांडवले मॅडम, यांनी केले व शेवटी उपस्थित त्यांचे आभार मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता 10 वी बॅच सन 2001-2002 मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच माजी विद्यार्थी औदुंबर सुतार, बाळू पोतदार, शहाजी मिसाळ, संजय मिसाळ, यांनी विशेष परिश्रम घेतले त्यानंतर माजी विद्यार्थी संजय मिसाळ यांच्या वतीने सर्वांना वृक्षवाटप करण्यात आले, तसेच श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी च्या भव्य प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे सांगता झाली.

No comments