Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, २३ मार्च, २०२५

जिजाऊ रथ यात्रेचे वाटंबरे येथे मोठ्या उत्साहात स्वागत.

 जिजाऊ रथ यात्रेचे वाटंबरे येथे मोठ्या उत्साहात स्वागत.


वाटंबरे /प्रतिनिधी:

मराठा जोडो अभियानांतर्गत १८ मार्च ते १ मे  २०२५   भोसले गडी वेरूळ ते  लाल महाल पुणे येथे निघालेल्या मराठा सेवा संघ संचलीत जिजाऊ रथ यात्रेचे रविवार दि. 23 मार्च रोजी वाटंबरे येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 


ही यात्रा वाटंबरे येथे आल्यावर या रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी जिजाऊ मातेचे पूजन केले .

यावेळी मोठ्या प्रमाणावर वाटंबरे गावातील महिला  उपस्थित होत्या. सर्वांनी या वेळी जय जिजाऊ, हर हर महादेव,  छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 


यावेळी वाटंबरे गावचे सरपंच उपसरपंच , सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart