उदनवाडी येथे मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा .
उदनवाडी येथे मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा .
उदनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांचा वाढदिवस काल शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 8.30 वा. अंगणवाडी शाळा व जि. प. मराठी शाळा उदनवाडी या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. त्यानंतर सकाळी 9.30 वा. जि. प. मराठी शाळा उदनवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ठीक 10 वा. सुदर्शन हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये मोठ्या संख्येने रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये अनेक रुग्णांनी आपला सहभाग नोंदवला. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्यावतीने मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुद्धा रुग्णांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. त्यानंतर संध्याकाळी 8.30 वा. मायाक्कादेवी
मंदिर परिसर उदनवाडी या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मा. विकास दत्तात्रेय वलेकर सर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने सांगोला तालुक्यातील विविध गावातून त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता. काहीजणांनी मा. विकास वलेकर सर यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. त्यांचा जनसामान्यांचा नेता असा उल्लेख केला. उदनवाडी व उदनवाडी.परिसरातून, नाझरा ,कोळा, चोपडी, बलवडी, जुनोनी तसेच विविध गावातून मोठ्या संख्येने त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता . विकास वलेकर यांचा मित्रपरिवार, महिला भगिनी, लहान लहान थोर मंडळी, कलाकार बंधू, दिव्यांग बांधव, बांधकाम कामगार बंधू ,सर्वांनी विकास वलेकर सर यांना वाढदिवसानिमित्त व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. शेवटी विकास ओलेकर सर यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल, सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल,सर्वांचे आभार मानले तसेच इथून पुढच्या काळामध्ये ही आपले सामाजिक कार्य असे चालू राहील आपले सर्वांना सहकार्य राहील सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळेच माझ्या हातून सामाजिक कार्य घडत आहे हे असे चालू राहील असे विकास वलेकर यांनी सांगितले. अनावश्यक खर्चाला खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा केल्याबद्दल मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.🙏


No comments