सांगोला ( चोपडी मार्गे) आटपाडी एसटी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा: पत्रकार दशरथ बाबर
सांगोला /प्रतिनिधी (दशरथ बाबर): सांगोला आगाराची सांगोला ते आटपाडी एसटी बस सेवा चोपडी मार्गे सुरु करण्यात आली असून सांगोला येथून सकाळी 11 वाजता सांगोला ते आटपाडी एसटी बस चोपडी मार्गे आटपाडीस जाणार आहे. ही एसटी बस चोपडी येथे सकाळी 11:45 वाजता पोहोचेल व आटपाडीतुन परत 12:45 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान चोपडीतून सांगोल्याकडे मार्गस्थ होणार आहे. तरी या एसटी बस सेवेचा प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला एसटी आगार प्रमुख विकास पोपळे व पत्रकार दशरथ बाबर यांनी केले आहे.
ही सांगोला ते आटपाडी एसटी बस सेवा काही दिवसापूर्वी सुरू केली होती. त्यानंतर चोपडी ते चिंध्यापिर रस्त्याचे काम सुरू झाल्याने ही बस सेवा बंद होती. ही बससेवा पूर्ववत करण्यात आली असून प्रवाशांनी या एसटी बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पत्रकार दशरथ बाबर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा